अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्राला तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. नद्या कोरड्या पडल्या असून, धरणांमधील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा कमी झाला आहे. येत्या पावसाळ्याला अजून नऊ महिन्यांहून अधिक काळ बाकी आहे, त्यामुळे सध्या उपलब्ध असलेलं पाणी वाचवण्यासाठी जलसंधारण हाच एकमेव उपाय आहे. आपण नागरिकांनी पुरवठा होणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब जपून कसा वापरला पाहिजे याबद्दल पुण्याचे निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी मार्गदर्शन केलं आहे. गेल्या १८ वर्षांपासून ते जलसंधारणासाठी काम करत आहेत.









