Raj Thackeray: प्रशांत कुलकर्णी यांच्या हास्यरेषा या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते. राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं.





















