Cyclone Murasu: अर्णब चक्रीवादळानंतर आता आणखी एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झाले आहे. २८ ऑक्टोबर रोजी ‘अर्णब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर आठवडाभराच्या आत बंगालच्या उपसागरात दुसरे चक्रीवादळ तयार झाले असून, ‘मुरासु’ असे नाव त्या चक्रीवादळाला देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ ३ नोव्हेंबर रोजी सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.













