बंगळुरूमधील इंदिरानगर परिसरात एका तरुणीला चाकूचा धाक दाखवत ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुकानात एकटीच काम करत असलेल्या २३ वर्षीय तरुणीचे हात फेविक्विकने चिटकवून आरोपीने तिच्या गळ्याला चाकू लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या गळ्यातील सोनसाखळी लुटल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखणाऱ्या नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. प्रभुराजने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.













