विधानसभा निवडणुकीसाठी गेले पाच दिवस निवडणूक कार्यालयांकडे न फिरकणाऱ्या उमेदवारांनी आघाडी आणि युतीचा सोक्षमोक्ष लागताच शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. दिवसभरात सब्बल १९९० उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांच्या रागा लांगण्याची शक्यता आहे.
सर्वच पक्ष आणि आघाडय़ांचा खेळ गेले काही दिवस सुरू होता. त्यामुळे उमेदवार निश्चित होऊनही आघाडी वा युतीचा निर्णय होण्यासाठी तसेच बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांची घोषणा करणे टाळले होते. त्यामुळे अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचा अपवाद सोडता कोणीच उमेदवारी अर्ज  दाखल केले नव्हते. परिणामी पाच दिवसात २८८ जगांसाठी केवळ  हजारभर  उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.