News Flash

प्रताप सरनाईक यांच्यावर २० गुन्हे

ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे तसेच डोंबिवली परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून त्यामध्ये चोरीचा गुन्ह्य़ाचाही समावेश आहे.

| September 27, 2014 03:17 am

ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे तसेच डोंबिवली परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून त्यामध्ये चोरीचा गुन्ह्य़ाचाही समावेश आहे. याशिवाय लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करणे, बेकायदेशीर जमाव करणे,  बलाचा प्रयोग करणे, मानवी व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात येणारी कृती करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणे, अशा स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे. सरनाईक यांच्याकडे सात कोटी ३६ लाख २३ हजार ६४३ रुपयांची जंगम तर नऊ कोटी १४ लाख चार हजार रुपये स्थावर मालमत्ता आहे. तसेच त्यांच्याकडे टोयोटो लॅन्ड क्रुझर ही कार आहे. अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्याकडे पाच कोटी ८१ लाख ९१ हजार ५४९ रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर ११ कोटी ८८ लाख ८ हजार ९६३ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे स्कोडा कार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:17 am

Web Title: 20 cases against pratap sarnaik
टॅग : Pratap Sarnaik
Next Stories
1 सरदार तारांसिंग यांची श्रीमंती पाच पर्षांत अडीचपट
2 चौरंगी, पंचरंगी लढतींमुळे सर्वच पक्षांची कसोटी
3 काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अवघड स्थिती
Just Now!
X