25 September 2020

News Flash

रिपाइंचा ३० कलमी जाहीरनामा

भाजपशी युती करुन केवळ अधिकृतपणे तीन जागा लढविणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने आपला ३० कलमी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

| October 13, 2014 02:04 am

भाजपशी युती करुन केवळ अधिकृतपणे तीन जागा लढविणाऱ्या रिपब्लिकन पक्षाने आपला ३० कलमी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्याच्या पुस्तिकेवर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायचित्रे आहेत, परंतु समाजसुधारक जोतिबा फुले व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा रिपाइंला विसर पडल्याचे दिसते. रिपाइंने जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांची खैरात केली आहे. विधानसभा निवडणुकीत तीनच मतदारसंघात त्यांचे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित आहेत. इतर पाच मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. मतदानाला तीन-चार  दिवसांचा अवधी राहिला असताना, रिपाइंने शनिवारी त्यांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात मागासवर्गीय, झोपडपट्टीधारक, भूमिहिन यांच्या कल्याणासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत, याची जंत्री देण्यात आला आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे रिपब्लिकन पक्षाचे आदर्श मानले जातात. परंतु जाहीरनाम्याच्या पुस्तिकेवर फुले-शाहूंची  छायाचित्रे नाहीत. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. परंतु कोल्हापूरला शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याचा उल्लेख नाही. २०१० पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण व झोपडीधारकांना ४५० चौरस फुटांची घरे देण्याचे हमी देण्यात आली आहे. २८८ पैकी ३ जागा लढविणाऱ्या पक्षाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:04 am

Web Title: 30 fold program of rpi contesting three seat
टॅग Rpi
Next Stories
1 राज ठाकरे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2 काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
3 नेत्यांचा मेकओव्हर.. असाही!
Just Now!
X