विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ठाणे जिल्ह्य़ातील मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूकपूर्व मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अखेरच्या दीड महिन्यात जिल्ह्य़ामध्ये सुमारे ७३ हजार ५४२ नवे अर्ज प्राप्त झाले आहेत. या मतदार नोंदणी अर्जाची छाननी होऊन २७ सप्टेंबपर्यंत या नवमतदारांची अखेरची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या नवमतदारांना मतदान यादीतील त्यांच्या क्रमांकाची स्लिप घरपोच करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून या स्लिपच्या आधारे ते मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकणार आहेत, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  
ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनानंतर प्रथमच निवडणुका होत असून विभाजनानंतर जिल्ह्य़ात सुमारे तीन लोकसभा मतदारसंघ असून त्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ६ हजार १७५ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या ७३ हजार ५४२ मतदारांसह यापूर्वी नोंदणी झालेले ५९ लाख १ हजार ७३२ मतदार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजाऊ शकणार आहेत. त्यामध्ये ३२ लाख ४४ हजार ६३ पुरुष, तर २६ लाख ५७ हजार ५०९ स्त्रिया आहेत. १६० तृतीयपंथी मतदार आणि १ हजार ६८६ सैनिक मतदारांची नोंदणी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. प्रतिनिधी, ठाणे
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ठाणे जिल्ह्य़ातील मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूकपूर्व मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या अखेरच्या दीड महिन्यात जिल्ह्य़ामध्ये सुमारे ७३ हजार ५४२ नवे अर्ज प्राप्त झाले आहेत. या मतदार नोंदणी अर्जाची छाननी होऊन २७ सप्टेंबपर्यंत या नवमतदारांची अखेरची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या नवमतदारांना मतदान यादीतील त्यांच्या क्रमांकाची स्लिप घरपोच करण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून या स्लिपच्या आधारे ते मतदान केंद्रात जाऊन मतदान करू शकणार आहेत, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  
ठाणे जिल्ह्य़ाच्या विभाजनानंतर प्रथमच निवडणुका होत असून विभाजनानंतर जिल्ह्य़ात सुमारे तीन लोकसभा मतदारसंघ असून त्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये ६ हजार १७५ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे. नव्याने नोंदणी झालेल्या ७३ हजार ५४२ मतदारांसह यापूर्वी नोंदणी झालेले ५९ लाख १ हजार ७३२ मतदार या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजाऊ शकणार आहेत. त्यामध्ये ३२ लाख ४४ हजार ६३ पुरुष, तर २६ लाख ५७ हजार ५०९ स्त्रिया आहेत. १६० तृतीयपंथी मतदार आणि १ हजार ६८६ सैनिक मतदारांची नोंदणी प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.