News Flash

‘आप’मतदार जागृती करणार!

निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेल्या आम आदमी पक्षाने कुणालाही पाठिंबा न देण्याचा, तसेच केवळ मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे

| September 27, 2014 03:06 am

निवडणुकीच्या रिंगणात न उतरलेल्या आम आदमी पक्षाने कुणालाही पाठिंबा न देण्याचा, तसेच केवळ मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत ‘आप’ स्वत: निवडणूक लढणार नाही, तसेच कोणलाही पाठिंबा देणार नाही. इतकेच नव्हे, तर पक्षाचा कुणी सदस्य एखाद्या पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यास त्याचे पक्ष सदस्यत्व आपसूकच संपुष्टात येईल.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते ‘जागृत नागरिक’ या नावाने मतदारांच्या प्रबोधनाची मोहीम राबवतील, तसेच प्रत्येक मतदारसंघात भ्रष्ट उमेदवार निश्चित करणे आणि गैरमार्गाना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतील असे पक्षाने ठरवले आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांबद्दल सखोल माहिती गोळा करून, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या, घोटाळ्यांशी संबंध असलेल्या आणि संपत्तीत अचानक प्रचंड वाढ झालेल्या उमेदवारांची माहिती मतदारांना दिली जाईल. गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांबाबतच्या माहितीची पत्रके वितरित केली जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:06 am

Web Title: aap to aware voters
Next Stories
1 ‘केरळमधील राजकीय हिंसाचार थांबवा ’
2 अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई
3 कारागृहात असलेले जैन, देवकर यांची पुन्हा उमेदवारी
Just Now!
X