आदिवासी विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित आश्रमशाळांसाठी २०० कायमस्वरूपी अतिरिक्त तुकडय़ांच्या नैसर्गिक वाढीच्या प्रस्तावाला मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे अशा आश्रमशाळा परिसरात कायमस्वरूपी २०० अतिरिक्त तुकडय़ा मंजूर करण्याचा निर्णय जुलै २००८च्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. आता या तुकडय़ांच्या नैसर्गिक वाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच अचानक तपासणीमध्ये पटपडताळणीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या पात्र आठ आश्रमशाळांच्या २०११ ते २०१५ या शैक्षणिक वर्षांतील नैसर्गिक तुकडय़ावाढीसही मान्यता देण्यात आली.