26 September 2020

News Flash

लक्षवेधी लढती

मुंबईतील कालिना मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा रिंगणात आहेत.

| October 13, 2014 01:44 am

मुंबईतील कालिना मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा एकदा रिंगणात आहेत. १९९९ पासून ते निवडून येत आहेत. यापूर्वी सांताक्रुझ मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मतदारसंघ फेररचनेनंतर ते कालिनातून गेल्या वेळी निवडून आले. त्यांना शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पोतनीस यांचे आव्हान आहे. याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक हे राष्ट्रवादीकडून उभे आहेत.lok11
औरंगाबाद मध्य मतदारसंघात गेल्या वेळी शिवसेनेतून बंडखोरी करून निवडून आलेले प्रदीप जैस्वाल यांना यंदा सेनेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य किशनचंद तनवाणी यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आहे, तर पत्रकार एम्तियाज जलील हे हैदराबादच्या ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून रिंगणात आहेत. काँग्रेसने एम.एम.शेख यांना संधी दिली आहे.lok12

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:44 am

Web Title: attention catching assembly election contests
Next Stories
1 काँग्रेसच्या राज्यात मच्छिमार नेहमी दुर्लक्षित- मोदी
2 ‘भ्रष्टाचाराचा महामेरू’ महाराष्ट्र रक्षणाय!
3 सोनियांच्या सभेसाठी आणलेल्या महिलांना ‘हात’ दाखवून ‘ठेंगा’
Just Now!
X