News Flash

लक्षवेधी लढती

प्रतिष्ठेच्या ठाणे मतदारसंघात यंदा चुरशीची तिरंगी लढत होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्या राजन विचारे यांच्यापुढे मनसेने मोठे आव्हान उभे केले होते.

| October 12, 2014 03:18 am

प्रतिष्ठेच्या ठाणे मतदारसंघात यंदा चुरशीची तिरंगी लढत होत आहे. गेल्या वेळी शिवसेनेच्या राजन विचारे यांच्यापुढे मनसेने मोठे आव्हान उभे केले होते. या वेळी काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक हे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. त्यांना भाजपकडून माजी आमदार संजय केळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी आव्हान दिले आहे.
lok02नगर जिल्ह्य़ातील कोपरगाव मतदारसंघात सहकारातील काळे-कोल्हे या घराण्यातील संघर्ष पुन्हा दिसणार आहे. सहकारातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा स्नेहलता बिपीन कोल्हे या भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. त्यांचा सामना दिवंगत नेते शंकरराव काळे यांचे नातू
आशुतोष काळे यांच्याशी आहे. राज्यातील सर्वाधिक खर्चीक लढतींपैकी एक असे याचे
वर्णन केले जाते.lok03

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:18 am

Web Title: attention catching election contests
Next Stories
1 महाराजकारणी: नरेंद्रमहाराज
2 देशाचे चित्र पालटण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
3 प्रचाराचा रविवार!
Just Now!
X