देशाचे आर्थिक मापदंड सुधारणे याला एनडीए सरकार तातडीने प्राधान्य देणार आहे, मात्र रामजन्मभूमीचा प्रश्न अद्यापही भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहे, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांनी येथे स्पष्ट केले.
आम्हाला सर्व प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडवायचे आहेत. मात्र देशाचे आर्थिक मापदंड सुधारणे आणि देशाला विकासाच्या पथावर आणणे व सुशासन याला प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.
रामजन्मभूमी, समान नागरी कायदा आणि कलम ३७० हे प्रश्नही भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेवर आहेत, सर्व प्रश्न त्वरेने सोडविता येणार नाहीत, आम्ही राममंदिर बांधणार नाही तर मंदिर बांधण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करून सरकार मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करून देणार आहे, असेही ते म्हणाले.
रामजन्मभूमीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, मात्र निवडणुकीपूर्वी जी आश्वासने देण्यात आली होती त्याप्रमाणे सरकारला पावले उचलावी लागतील, असेही राव म्हणाले.