राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ‘दृष्टीपत्र’ या नावाने तयार करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात तुर्तास तरी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळण्यात आले आहे. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याच्या भूमिकेचा आगामी निवडणुकांत फटका बसू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा नसला तरी, छोटी राज्य करण्याचा भूमिकेवर भाजप अजूनही ठाम असल्याचे यावेळी पक्षाचे नेते माधव भंडारी यांच्याकडून स्पष्ट आले.  भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे, माधव भंडारी आणि केशव उपाध्ये यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक आश्वासने पुढीलप्रमाणे:
* महाराष्ट्रात लोकसेवा हमी कायदा आणणार
* सरकारी कार्यालयांमध्ये एकखिडकी योजना लागू करणार
* सत्तेत आल्यास त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार
* ठिंबक सिंचन योजनेसाठी ५० टक्के अनुदान देणार
* राज्यात ऊसतोड कामगार कल्याण योजना आणणार
* महाराष्ट्रात माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना करणार
* माहेरचा आधार ही पेन्शन योजना
* पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार
* वयोवृद्ध शेतक-यांसाठी अन्नदाता आधार योजना
* मराठी शाळांचे आर्थिक सबलीकरण करणार
* वृद्ध श्रमिक पत्रकारांना मासिक १५०० रूपये मानधन देणार

BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
Code of Conduct in Thane
ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न
prakash ambedkar
मविआ-वंचित चर्चेची दारे बंद? तीन जागा स्वीकारण्यास आंबेडकर यांचा नकार