News Flash

शिवसेनेतील नाराजांवर भाजपची नजर

भारतीय जनता पक्षाशी काडीमोड झाल्यानंतर ठाणे जिल्'ाातील बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेला स्वपक्षातील बंडोबांना आवरण्याचे मोठे आव्हान येत्या काही दिवसात पेलावे लागण्याची चिन्हे

| September 27, 2014 03:36 am

भारतीय जनता पक्षाशी काडीमोड झाल्यानंतर ठाणे जिल्’ाातील बालेकिल्ल्यात मुसंडी मारण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेला स्वपक्षातील बंडोबांना आवरण्याचे मोठे आव्हान येत्या काही दिवसात पेलावे लागण्याची चिन्हे असून काल-परवा पक्षात आलेल्या आयारामांना ऊमेदवारी देण्याचा धडाका सेना नेतृत्वाने लावल्याने ‘नाराजां’ना टिपण्याची रणनिती भाजपच्या चाणाक्यांनी आखल्याचे वृत्त आहे.
ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची अवस्था अगदीच तोळामासा आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघात ऊमेदवार मिळवताना या पक्षाची तारांबळ ऊडाली आहे.  कल्याण ग्रामीणमधून रमेश म्हात्रे, पुर्वेतून गणपत गायकवाड, नवी मुंबईतून विजय चौगुले अशा काही नेत्यांवर भाजप नेत्यांनी गळ टाकल्याची चर्चा होती. कळवा-मुंब््रयात दशरथ पाटील यांची ऊमेदवारी जाहीर होईल अशी चिन्हे दिसताच तेथे सेनेच्या काही स्थानिक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.  
उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील नाराजांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून सुरु झाले असून दिवसभर यासाठी प्रयत्न केले जात होते. ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील शिवसेनेच्या यादीवर संपर्क प्रमुख आमदार एकनाथ िशदे यांचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवत असला तरी अनेकांना ऊमेदवारीसाठी ‘शब्द’ देण्याचा फंद्यात पक्षात नवा घोळ ऊभा रहाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब््रयातून पराभूत झालेले सुभाष भोईर यांना कल्याण ग्रामीण मतदारसंघातून ऊमेदवारी जाहीर केल्याने याठिकाणी पक्षात मोठे बंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या मतदारसंघातील इच्छुक ऊमेदवार रमेश म्हात्रे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्तामुळे त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेत दिवसभर पळापळ सुरु होती. कल्याण पुर्व मतदारसंघात अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना पक्षात घेण्यावरुन सुरु असलेला घोळ संपला नसल्याने येथून गोपाळ लांडगे यांची ऊमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गायकवाड यांची पाऊले भाजपच्या दिशेने पडू लागली असून त्यांचा शिवसेना प्रवेश पक्का व्हावा यासाठी एकनाथ िशदे यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु होती.
 कळवा-मुंब््रयात अडीच वर्षांपुर्वी पक्षात आलेले दशरथ पाटील यांना ऊमेदवारी जाहीर करुन जुन्या शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेण्यात आली असून ठाणे शहर मतदारसंघात रिवद्र फाटक यांच्या उमेदवारीवरुन असेच नाराजीनाटय़ रंगण्याची चिन्हे आहेत.
नवी मुंबईत जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांची ऊमेदवारी अखेरच्या क्षणापर्यंत तंगवून ठेवण्यात आल्याने त्यांनाही भाजप नेत्यांनी संपर्क सुरु केला होता. मात्र, खासदार राजन विचारे यांनी शेवटच्या क्षणी चौगुले यांची ‘मातोश्री’वारी घडविल्याने त्यांचे बंड क्षमल्याचे बोलले जाते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:36 am

Web Title: bjp keeps eye on shiv sena reluctants
टॅग : Bjp
Next Stories
1 काँग्रेसचे लक्ष्य अजित पवार!
2 भाजप की शिवसेना?
3 मुख्यमंत्रिपद हाच तुटीमागील मुद्दा
Just Now!
X