News Flash

नव्या सरकारचे खातेवाटप निश्चित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

| November 2, 2014 10:53 am

महाराष्ट्रात नव्याने दोनच दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या भाजप सरकारचे खातेवाटप जवळपास निश्चित झाले आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते देण्यात आले आहे. तर, अर्थ खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शालेय शिक्षण व उच्च, तंत्रशिक्षण दोन विभाग एकत्र करत मनुष्यबळ विकास असे नवे खाते निर्माण करून त्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. शिक्षक आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार व पणन मंत्रालय देण्यात येणार आहे. तर, विष्णू सवरा यांना आदिवासी विकास तर पंकजा मुंडे-पालवे यांच्याकडे ग्रामविकास खाते असणार आहे. मुंबईतील आमदार प्रकाश मेहता यांच्याकडे खाण व उद्योग मंत्रालय असणार आहे.

मंत्री – खाते
देवेंद्र फडणवीस- गृह, नगरविकास आणि अजून जाहीर न झालेली खाती
सुधीर मुनगंटीवार- अर्थ आणि नियोजन, वनमंत्री
एकनाथ खडसे- महसूल, कृषी, उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, पशुपालन, दुग्धव्यवसाय
विनोद तावडे- शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य
पंकजा मुंडे- ग्रामविकास, महिला बालकल्याण, जलसंवर्धन
प्रकाश मेहता- उद्योग आणि खाण
विष्णू सावरा- आदिवासी विकास, सामाजिक न्याय
चंद्रकांत पाटील- सहकार, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम
विद्या ठाकूर (राज्यमंत्री): ग्रामविकास, जलसवंर्धन, महिला बालकल्याण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2014 10:53 am

Web Title: chief minister devendra fadnavis new cabinet
Next Stories
1 पहिला दिवस शुभेच्छा अन कामकाजाचा..
2 मंत्र्यांनीही कित्ता गिरवला
3 मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ प्रवेशाला पुढच्या आठवडय़ातील मुहूर्त!
Just Now!
X