21 September 2020

News Flash

काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

सभा घेण्याच्या कारणावरून भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

| October 13, 2014 02:00 am

सभा घेण्याच्या कारणावरून भाजपा कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई रोड परिसरातील एलआयसी कार्यालयाजवळ सायंकाळी प्रचारसभा घेण्याची तयारी भाजपा कार्यकत्रे करत असताना त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉड, काठय़ा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही माहिती कळताच उमेदवार लाहोटी यांनी तातडीने स्वत: पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. या तक्रारीत काँग्रेस कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याच्या पाठीमागे असलेल्या नगरसेवक दीपक सूळ, बंडू किसवे, आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याच भागात भाजपच्या प्रचारवाहनावर दगडफेक झाली होती. काँग्रेसच्या दहशतीला आपण भीक घालणार नसल्याचे लाहोटी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:00 am

Web Title: clash in congress bjp workers in latur
Next Stories
1 नेत्यांचा मेकओव्हर.. असाही!
2 भाजपला आघाडीची संधी; काँग्रेसची दयनीय अवस्था
3 संजय देवतळेंना ‘भागवत’दर्शनाची आस
Just Now!
X