News Flash

मोनोरेलचा दुसरा टप्पा मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करा

चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाला.

| August 31, 2014 03:54 am

चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा फेब्रुवारी २०१४ मध्ये सुरू झाला. आता वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा दुसरा टप्पा मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करण्यासाठी जलदगतीने काम करा, असा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिला आहे. त्याचबरोबर घाटकोपर-कासारवडवली मेट्रो रेल्वे मार्गासाठीचा प्रकल्प अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम, खेरवाडी जंक्शन येथील उड्डाणपूल, नियोजित वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो रेल्वे, चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वे आदी प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या सुमारे २० किलोमीटर लांबीच्या मोनोरेल मार्गापैकी चेंबूर ते वडाळा हा नऊ किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:54 am

Web Title: complete monorail 2 phase before march 2015
टॅग : Monorail
Next Stories
1 ठाण्यात शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे भूमिपूजन
2 तृणमूलशी आघाडीला डाव्या पक्षांचा नकार
3 ‘अच्छे दिन’आल्याची जेटली यांची ग्वाही
Just Now!
X