काँग्रेस पक्षाने आखून दिलेली सीमारेषा पाळणे हा पक्षाच्या नेत्यांचा धर्म आहे आणि जर मनीष तिवारी अशी सीमारेषा पाळू शकणार नसतील तर त्यांना लेखी पद्धतीने कळविण्यात येईल, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्त्या शोभा ओझा यांनी माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांना फटकारले. माजी सरन्यायाधीश पी. सथशिवम् यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. या मुद्दय़ावरून काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती. मात्र काँग्रेसच्याच तिवारी यांनी ‘ही प्रथा काँग्रेस पक्षानेच सुरू केली’ असे विधान केले होते.