21 September 2020

News Flash

छत्तीसगढ पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त अंतागढ मतदारसंघात १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली आह़े

| September 1, 2014 03:17 am

छत्तीसगढमधील नक्षलग्रस्त अंतागढ मतदारसंघात १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या उमेदवाराने अचानक माघार घेतली आह़े  मंतुराम पवार असे उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या आदिवासी नेत्याचे नाव आह़े  या प्रकारामुळे काँग्रेसच्या अंतर्गत गोटात खळबळ माजली असून, वरिष्ठ नेते उमेदवार निवडीबाबत परस्परांना दोष देत आहेत़
याच मतदारसंघातून पवार यांचा दोनदा पराभव झाला आह़े  गेल्याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उसेंदी यांनी पवार यांचा ५ हजार १७१ मतांनी पराभव केला होता़  उसेंदी लोकसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा रिकामी झाली आह़े  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:17 am

Web Title: congress keeps away from chhatisgarh bypolls
Next Stories
1 सोनिया गांधी आजपासून रायबरेलीच्या दौऱ्यावर
2 प्रशासकांच्या काळात राज्य बँक फायद्यात
3 विद्यासागर राव यांना शपथ
Just Now!
X