22 September 2020

News Flash

सोलापूरात काँग्रेसच्या नेत्याला पैसे वाटताना अटक

विधानसभेच्या प्रचाराची मुदत सोराज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याला पैसे वाटताना पकडले गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली 'लक्ष्मीदर्शना'ची परंपरा

| October 13, 2014 09:12 am

विधानसभेच्या प्रचाराची मुदत सोराज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याला पैसे वाटताना पकडले गेले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली ‘लक्ष्मीदर्शना’ची परंपरा आजदेखील सुरू असलेली पहायला मिळाली. मवारी सायंकाळी संपल्यानंतर सोलापूरमधील एका हॉटेलमधील कक्षात पैसे वाटले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या हॉटेलमध्ये टाकण्यात आलेल्या धाडीत कॉंग्रेसच्या नेत्याकडून सहा लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. हॉटेलमधील ज्या कक्षात पैसे वाटण्यात येत होते, त्या कक्षात आंध्र प्रदेशातील लोधी समाजाचे नेते प्रेमलाल लोधा मुक्कामाला असल्याचे समजते. पोलीस प्रशासन यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी ही रक्कम वाटण्यासाठी नाही तर पक्षाच्या  खर्चाची होती असे स्पष्टीकरण दिले आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 9:12 am

Web Title: congress leader arrested in solapur while distributing cash
टॅग Solapur
Next Stories
1 महाराष्ट्रात १३ दिवसांत ७१५ प्रचारसभा! गडकरींनी घेतल्या सर्वाधिक १०४ सभा
2 शिवसेनेला कंटाळलो होतो!
3 विधानसभेच्या प्रचाराची सांगता, आता उत्सुकता मतदानाची
Just Now!
X