News Flash

जपानमध्ये धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविणे धक्कादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यात धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविल्याने काँग्रेसने संताप व्यक्त करीत मोदींवर जोरदार टीका केली आहे.

| September 4, 2014 04:13 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यात धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविल्याने काँग्रेसने संताप व्यक्त करीत मोदींवर जोरदार टीका केली आहे. परकीय भूमीत जाऊन अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा प्रकार धक्कादायक आणि अशोभनीय असून त्यामुळे जपानमध्ये भारताचे हसे झाले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
भारतात मोदी यांचा पक्षच जातीय तणाव वाढवीत असताना परकीय भूमीवर जाऊन धर्मनिरपेक्ष शक्तींवर टीका करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी ट्विट केले आहे. धर्मनिरपेक्षतेवर केलेली टीका अशोभनीय, अस्वीकारार्ह आणि अनपेक्षित आहे, असे झा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:13 am

Web Title: congress slams modi over his secularism remark in japan
Next Stories
1 काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना डावलून कार्यकर्ता प्रशिक्षण
2 बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडून साठेबाजीचे समर्थन
3 तिवारी यांना स्वपक्षीयांकडून घरचा अहेर
Just Now!
X