21 September 2020

News Flash

वाढदिवसानिमित्ताने खडसे यांचे शक्तिप्रदर्शन

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव व परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

| September 1, 2014 03:21 am

मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत उतरलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव व परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खडसे यांची लोकप्रियता व कामगिरी दाखविणारे ते एकप्रकारे शक्तीप्रदर्शनच ठरणार आहे.
भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यात स्पर्धा असली तरी खडसे यांनीही या आपण ही जबाबदारी पेलण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या नाजूक तब्येतीमुळे काही अडथळे येत असले तरी त्यांच्याकडून आता पद्धतशीरपणे पावलेही टाकली जात आहेत. त्यांच्या वाढदिवशी जळगावात दरवर्षी काही कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा हे कार्यक्रम अधिक मोठय़ा प्रमाणावर व ताकदीने होण्यासाठी खडसे यांचे कार्यकर्ते व हितचिंतक झटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:21 am

Web Title: eknath khadse to show muscles on birthday occasion
टॅग Bjp,Eknath Khadse
Next Stories
1 छत्तीसगढ पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
2 सोनिया गांधी आजपासून रायबरेलीच्या दौऱ्यावर
3 प्रशासकांच्या काळात राज्य बँक फायद्यात
Just Now!
X