निवडणूक आयोगाने आग्रीपाडा पोलिसांच्या सहाय्याने सोमवारी ४५.७० लाख रुपयांची रक्कम जप्त केली. जेकब सर्कल परिसरात एका डॉक्टरकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान या पैशांचा वापर होत असावा, या शंकेने ही रक्कम ताब्यात घेण्यात आली. मात्र या ६१ वर्षीय डॉक्टरची चौकशी केली असता त्याने ही शक्यता फेटाळली. एका विकासकाला ही रक्कम देण्यासाठी घेऊन जात होतो, असे या डॉक्टरने सांगितले. मात्र दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगण्यास मनाई आहे.