News Flash

भावी मुख्यमंत्र्यांसमोर आर्थिक अडचणींचा पाढा!

भाजपने राज्याचा विकास आणि प्रगतीसाठी जे गुलाबी चित्र रंगविले आहे, ते साकारण्याआधी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, याबाबत मुख्य सचिव आणि अर्थ विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी

| October 30, 2014 02:46 am

भावी मुख्यमंत्र्यांसमोर आर्थिक अडचणींचा पाढा!

भाजपने राज्याचा विकास आणि प्रगतीसाठी जे गुलाबी चित्र रंगविले आहे, ते साकारण्याआधी राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, याबाबत मुख्य सचिव आणि अर्थ विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांनी भाजपचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वस्तुस्थिती विशद केली. कर्जाचा डोंगर आणि जमा-खर्चाचा ताळेबंद पाहता विकासाची संकल्पना काय व कशी राबवायची, याचा पेच त्यांनी फडणवीस यांच्यापुढे मांडून दाखविला.
फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त गृह सचिव व अन्य अधिकाऱ्यांशी बुधवारी सह्य़ाद्री अतिथीगृहावर चर्चा करुन राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यावर तीन ते सव्वातीन लाख कोटी रुपयांचे कर्ज असून खर्च वाढत आहेत. वेतन आणि अन्य आवश्यक बाबींवरील खर्चात वाढ होत असून विकास कामांसाठी अपुरा निधी उपलब्ध होत आहे. विकासासाठी अधिकाधिक निधी कसा उपलब्ध करुन द्यायचा, हे मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर उद्योग व विकासाच्या अन्य बाबींना चालना देण्यासाठी कशाप्रकारे पावले टाकावी लागतील, पण त्यामध्ये कोणते अडथळे आहेत, याविषयी अधिकाऱ्यांनी बैठकीत वस्तुस्थिती मांडली.
भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती पाहता त्याला किती मर्यादा येतील, याची जाणीव अधिकाऱ्यांनी  फडणवीस व अन्य नेत्यांना करुन दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2014 2:46 am

Web Title: financial crisis informant of future cm of maharashtra
टॅग : Financial Crisis
Next Stories
1 शिवसेनेची आज मातोश्रीवर बैठक
2 ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ रवींद्र आंग्रेही भाजपच्या वाटेवर
3 पाच वर्षांत काँग्रेसचा अस्त!
Just Now!
X