News Flash

‘चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही मुख्यमंत्री होणारच!’

चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही राज्याचा मुख्यमंत्री होणारच, असा ठाम विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

| October 14, 2014 07:55 am

चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही राज्याचा मुख्यमंत्री होणारच, असा ठाम विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या ‘सामना’ या मुखपत्रासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले आहे.
ज्या पक्षासोबत गेली २५ वर्षे एकत्र राहिलो, जय-पराजय पाहिले, त्यांच्यासोबतची युती तुटल्याचे दु:ख आहेच परंतु, मी त्यांना शरण गेलो नाही, याचे समाधान असल्याचे उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले आहेत. जर एक चहावाला माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर, मी मुख्यमंत्री का होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित करीत आपण मुख्यमंत्री बनणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात शिवसेनेचीच सत्ता येणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:55 am

Web Title: i will be maharashtra cm says uddhav thackeray
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 शिवसेनेने पराभव स्वीकारल्याने भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप- रुडी
2 परभणीत मनसेच्या उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश
3 स्वबळाच्या प्रयोगाची परीक्षा!
Just Now!
X