भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा असेल तर तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे स्पष्टद्ब करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचे वचन दिले, तर भाजपला सरकार स्थापनेसाठी साथ देण्याची भूमिका जाहीर केली. पण आपल्याकडे अजून कोणताही प्रस्ताव भाजपकडून आला नसल्याचे सांगून स्वत:हून बिनशर्त पाठिंबा देणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपने बासनात गुंडाळला, तरच शिवसेनेचे सहकार्य त्यांना मिळणार आहे.
बहुमत मिळविण्याची खात्री असलेल्या शिवसेनेला केवळ ६३ जागांपर्यंत मजल मारता आली. पण एकाकी असलेल्या शिवसेनेने चांगली लढत दिली, असे नमूद करीत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे हित व स्वाभिमान जपला जाईल. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपने पाठिंबा मागितला, तर त्यासाठी विचार केला जाईल. पण माझ्या अटी घेऊन मी स्वत:हून संपर्क साधणार नाही.
भाजपला जर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेणे पसंत असेल, तर शिवसेनेच्या मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा ठोस प्रस्ताव येईल, तेव्हा भाजपच्या सोबत जाण्याचा विचार केला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्टद्ब केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी दु:ख दिले, त्यांचा जनतेने पराभव केला, याचाही उल्लेख ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केला. शिवसेनेने जाहीर केलेली व्हिजन डॉक्युमेंट, रेसकोर्सच्या जमिनीवर थीम पार्क, किनारपट्टी मार्ग, विद्यार्थ्यांसाठी टॅब्लेट, टेलिमेडिसीन अशा विविध योजना या जनतेच्या भल्यासाठी होत्या. त्या काहींना पसंत पडल्या, काहींना पडल्या नसाव्यात, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. विशेष प्रतिनिधी, मुंबई
भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घ्यायचा असेल तर तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे स्पष्टद्ब करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्राचे वचन दिले, तर भाजपला सरकार स्थापनेसाठी साथ देण्याची भूमिका जाहीर केली. पण आपल्याकडे अजून कोणताही प्रस्ताव भाजपकडून आला नसल्याचे सांगून स्वत:हून बिनशर्त पाठिंबा देणार नाही, असेही स्पष्ट केले. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा भाजपने बासनात गुंडाळला, तरच शिवसेनेचे सहकार्य त्यांना मिळणार आहे.
बहुमत मिळविण्याची खात्री असलेल्या शिवसेनेला केवळ ६३ जागांपर्यंत मजल मारता आली. पण एकाकी असलेल्या शिवसेनेने चांगली लढत दिली, असे नमूद करीत ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचे हित व स्वाभिमान जपला जाईल. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. भाजपने पाठिंबा मागितला, तर त्यासाठी विचार केला जाईल. पण माझ्या अटी घेऊन मी स्वत:हून संपर्क साधणार नाही.
भाजपला जर राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेणे पसंत असेल, तर शिवसेनेच्या मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा ठोस प्रस्ताव येईल, तेव्हा भाजपच्या सोबत जाण्याचा विचार केला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्टद्ब केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी दु:ख दिले, त्यांचा जनतेने पराभव केला, याचाही उल्लेख ठाकरे यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता केला. शिवसेनेने जाहीर केलेली व्हिजन डॉक्युमेंट, रेसकोर्सच्या जमिनीवर थीम पार्क, किनारपट्टी मार्ग, विद्यार्थ्यांसाठी टॅब्लेट, टेलिमेडिसीन अशा विविध योजना या जनतेच्या भल्यासाठी होत्या. त्या काहींना पसंत पडल्या, काहींना पडल्या नसाव्यात, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.