05 August 2020

News Flash

काका-पुतण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा!

बारामतीच्या काका-पुतण्यांनी शेतकऱ्यांना पारतंत्र्यात अडकून ठेवले आहे. त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तापरिवर्तन घडविले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

| October 9, 2014 04:43 am

बारामतीच्या काका-पुतण्यांनी शेतकऱ्यांना पारतंत्र्यात अडकून ठेवले आहे. त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तापरिवर्तन घडविले पाहिजे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती येथील सभेत पवार कुटुंबीयांवर त्यांच्याच बालेकिल्ल्यात हल्ला चढवला. त्याचबरोबर ‘पवारांना साथ देणाऱ्या धनगर समाजाच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला’ असा उल्लेख करत या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्नही केला.
बारामती मतदारसंघातील जळोची या गावी मोदी यांची मोठी प्रचारसभा झाली. या सभेत मोदी काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. त्यांनी थेट पवार यांच्यावर हल्ला चढवला. ‘‘बारामतीची ही विराट सभा म्हणजे येथे जमलेल्या जनसमुदायाची दुसऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात आहे. आता शेतकऱ्यांच्या मुलाला नोकरी आणि शेतीसाठी हक्काचे पाणी मिळण्यासाठी राज्यातही परिवर्तन घडवा,’’ असे आवाहन त्यांनी केले. भाजपचे विनोद तावडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, धनगर समाजाचे हनुमंत सूळ आदी या वेळी उपस्थित होते.
‘‘बारामती औद्योगिक वसाहतीला पाणी नाही. शेतकरी उजनी धरणातील पाणी मागतात, तेव्हा नेते अपशब्द वापरतात. तेच राज्याचे मंत्री होतात. बारामतीमध्ये जेवढे पैसे आले आहेत, तेवढय़ा पैशात एखाद्या राज्याचा विकास झाला असता. मात्र, तरीसुद्धा येथील ४० गावे पाण्यापासून वंचित आहेत. येथील नेत्यांनी शासनाकडून भरपूर खजाना गोळा केला आहे. राष्ट्रवादीचे घडय़ाळ शांतपणे काम करीत आहे, असे वाटत असले तरी ते शांतपणे काम करीत नाही. त्यांनी दहा वर्षांत दहा वेळा भ्रष्टाचार केला आहे. ज्या धनगर समाजाने यांना साथ दिली त्यांच्याच पाठीत खंजीर खुपासला. याच धनगर समाजाने आज माझा सत्कार केला. मी त्यांचा अभारी आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘भारत-पाक सीमेवर चकमकी चालू असताना देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी महाराष्ट्र दौरा करत असल्याची टीका शरद पवार करतात. पण मी त्यांना विचारू इच्छितो की, आपण देशाचे संरक्षण मंत्री असताना सीमा भागात गेला तरी होतात का? देशाचे संरक्षण करण्यासाठी जवान सक्षम आहेत, त्यांना माझी गरज नाही. असे विषय राजकारणाच्या तराजूत तोलू नका,’’ असा टोलाही त्यांनी हाणला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2014 4:43 am

Web Title: liberate baramati from sharad ajit pawars slavery
Next Stories
1 अमित शहा, की ‘स्पॉट नाना’?
2 स्वतंत्र विदर्भ हा निवडणूक मुद्दाच नाही
3 गंगाखेडला आणखी पावणेपाच लाख जप्त
Just Now!
X