माझ्या कामाचा लेखाजोखा मागणाऱयांना गेल्या साठ वर्षांत पाकिस्तानातील तुरूंगात कैद असलेल्या भारतीय मच्छिमारांसाठी, गरीब कुटुंबातील मुला-मुलींसाठी काहीच करावेसे वाटले नसल्याची टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केली.  ते प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पालघर या कोळी समाज बहुल मतदार संघातील जाहीर सभेत बोलत होते.
येथील मच्छिमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून सत्तेत आल्यावर पाकिस्तानसोबतच्या चर्चेत सर्वात प्रथम मी भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचा प्रश्न उपस्थित केला. या चर्चेनंतर गेल्या १० वर्षात पहिल्यांदा पाकिस्तानने  ५० भारतीय बोटी आणि २०० मच्छिमारांची सुटका केल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
इराकसारख्या दहशतवादग्रस्त भागातून केरळमधील परिचारिकांच्या सुटकेचाही संदर्भ मोदी यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातील सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता राज्यात भाजपचेच सरकार येणार हे निश्चित असून काँग्रेस-राष्ट्रवादी या भ्रष्टवादी सरकारला यंदा जनता त्यांची जागा दाखवून देईल असा ठाम विश्वास असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.