VS_Vishleshan_300x200भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा सर्वच पक्षांचा कस लागलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येत्या रविवारी जाहीर होतील. युती, आघाडी तुटल्यामुळे पंचरंगी झालेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणता पक्ष राज्यात सत्तास्थापनेचा दावा करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे मतमोजणीनंतर स्पष्ट होतील. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स लोकसत्ता संकेतस्थळाच्या माध्यमातून रविवारी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. त्याचबरोबर ‘लोकसत्ता’चे राजकीय विश्लेषक दिनेश गुणे, संतोष प्रधान, मधु कांबळे, संदीप आचार्य आणि उमाकांत देशपांडे या निवडणुकीच्या निकालांचा अर्थ सोप्या पद्धतीने तुमच्यापुढे उलगडणार आहेत. ‘लोकसत्ता’च्या यूट्यूब चॅनेलवरून या विश्लेषणाचे लाईव्ह स्ट्रिमिंग रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाहायला मिळेल. कोणत्या मतदारसंघांमध्ये कोणता पक्ष आघाडीवर आहे. राज्यात कोण बहुमताच्या दिशेने वाटचाल करतो आहे, याचीही लाईव्ह माहिती तुम्हाला संकेतस्थळावर पाहता येईल. त्याचबरोबर निवडणुकीच्या निकालांवर आमच्या ब्लॉगर्सनी टाकलेला प्रकाशझोतही तुम्हाला वाचता येईल. तेव्हा निकालांचे सविस्तर वार्तांकन वाचण्यासाठी रविवारी लोकसत्ता संकेतस्थळ पाहायला विसरू नका…