News Flash

दिल्लीश्वरांपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात नको- उध्दव ठाकरे

दिल्लीश्वरांच्या आज्ञेपुढे शेपूट हलवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसवर टीका केली. ते दापोलीत सेनेचे उमेदवार

| October 12, 2014 04:40 am

दिल्लीश्वरांच्या आज्ञेपुढे शेपूट हलवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसवर टीका केली. ते दापोलीत सेनेचे उमेदवार सुर्यकांत दळवी यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
दिल्लीत काँग्रेसचे सरकार आणि राज्यातही आघाडी सरकार असूनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भल्यापेक्षा दिल्लीश्वरांच्या आज्ञेलाच अधिक महत्त्व दिले. असा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. मुख्यमंत्री कोण होणर हे दिल्ली न ठरवता, महाराष्ट्रातील जनता ठरवणार, असेही उध्दव यावेळी म्हणाले.
भाजपला सत्ता दिल्यास छत्रपती शिवाजी महाराजही डोक्यावर हात मारून ‘अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा’ असे म्हणतील, अशी भाजपच्या जाहिरातीची खिल्लीही उध्दव यांनी यावेळी उडवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 4:40 am

Web Title: maharashtra dont want cm who obey orders of delhi says uddhav thackeray
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 गुजरातहून ‘फौजा’!
2 ‘राष्ट्रवादी पुन्हा’ सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजेल- नरेंद्र मोदी
3 पृथ्वीराज चव्हाण प्रचारात एकाकी
Just Now!
X