पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेतील ‘मेडिसन स्क्वेअर’मधील भाषण विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहिरात म्हणून वापरल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप नोंदविला आहे.
टेलिव्हिजनवर मोदींचे अमेरिकेतील भाषण वारंवार दाखवून त्याला जाहिरात असे संबोधून पंतप्रधानांच्या भाषणाचा भाजप गैरवापर करत असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. नरेंद्र मोदींनी अमेरिकेत भाजपचे प्रतिनिधी म्हणून नाही तर, भारताचे पंतप्रधान म्हणून भाषण केले होते आणि या भाषणाचा भाजपने आपल्या निवडणूक प्रचारासाठी वापर करणे अयोग्य असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद  यांनी म्हटले आहे.
मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचा तब्बल अर्ध्यातासाचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर वारंवार दाखविण्यात येत असून या जाहिरातीत पक्षाच्या निवडणूक चिन्हासह  भाजपला मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे, यावर आमचा आक्षेप असल्याचेही ते पुढे म्हणाले.
modi-ms-l