News Flash

ठाण्यात शिवसेनेला धक्का; अनंत तरे अपक्ष लढणार

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी शिवसेनेला ठाण्यातील बंडखोरीने मोठा धक्का बसला आहे.

| September 27, 2014 04:11 am

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी शिवसेनेला ठाण्यातील बंडखोरीने मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. पक्षात सतत डावलले जात असल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे तरेंकडून स्पष्ट करण्यात आले असून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.  अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना चांगलाच रंग चढल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 4:11 am

Web Title: major setback for shiv sena in thane
टॅग : Shiv Sena
Next Stories
1 फुटीनंतर..शिवसेना एकाकी?
2 आता भाजपचे ‘मिशन १४५’!
3 ‘हाता’ विना ‘घडय़ाळा’ची टिकटिक
Just Now!
X