निवडणुका म्हटल्या की नेत्यांचे पेहेराव हा कायमच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. प्रचारादरम्यान महत्त्वाच्या नेत्यांच्या पेहेरावात येणारा तोच-तोचपणा टाळण्यासाठी डिझायनर राहुल अगस्थी यांनी काही बदल सुचविले. या नेत्यांचे मूळ पेहेराव आणि बदललेल्या वेशातील त्यांचे ‘लूक’ येथे देत आहोत.lok03
राजकीय नेत्यांचा विषय निघाला की, डोळ्यासमोर पांढऱ्याशुभ्र कुर्ता पायजमामधील नेत्यांची छबी डोळ्यासमोर येते. त्यात काहीजण कुर्त्यांवर जॅकेट्स घालण्यास पसंती lok04देतात. सध्या अनेक नेत्यांनी या छबीला छेद देत त्यांच्या कपडय़ांमध्ये काही वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जॅकेट्स आणि रंगीत कुर्त्यांच्या स्टाइलनंतर मात्र नेत्यांच्या या स्टाइलमध्ये बदल होऊ लागले आहेत. हे बदल लक्षात घेऊन महाराष्ट्रातील काही निवडक नेत्यांच्या स्टाइलला मेकओव्हर देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. नेत्यांना हा मेकओव्हर देण्याचे काम डिझायनर राहुल अगस्थी यांनी केले आहे. बाळासाहेब ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, लालकृष्ण अडवाणी यांसारख्या भारतातील अनेक आघाडीच्या राजकीय नेत्यांच्या सध्याच्या लूकचे श्रेय राहुल अगस्थी यांचे वडील माधव अगस्थी यांना जाते. त्यामुळे वडिलांचा हाच वारसा पुढे नेत, राहुल अगस्थी यांनी काही निवडक नेत्यांना एक नवीन lok06अंदाजमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
बदललेला लूक
पृथ्वीराज चव्हाणांचा लूक क्लासिक स्टाईलचा एक उत्तम नमुना आहे. गडद रंगाचे आणि लांब बाह्य़ांचे क्लासिक नेहरू शेरवानी आणि पांढरा चुडीदार हा लूक त्यांना साजेसा दिसू शकेल.
राज ठाकरे
राज ठाकरे बहुतेकवेळा पांढऱ्या कुर्ता आणि पायजमाला पसंती देतात. काही प्रसंगी पांढरे किंवा स्टाईप्सचे शर्ट lok05आणि गडद रंगाची पँट या वेशात दिसतात. त्यांच्या खास चष्म्याच्या फ्रेमसाठी ओळखले जातात.
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण नेहमी पांढरा कुर्ता, पायजमा आणि त्यावर गडद रंगाचे जॅकेट या वेशामध्ये दिसतात. अगदी क्वचित प्रसंगी ते फिक्कट राखाडी रंगाचे जॅकेट घालणेही पसंत करतात.
नवा लूक
राज ठाकरे यांच तरुण व्यक्तीमत्त्व लक्षात घेऊन गुरु शर्ट किंवा शॉर्ट कुर्ता, जॅकेट आणि ट्राऊझर हा लूक देण्यात आला आहे. नेहमीच्या पांढऱ्या रंगाऐवजी बदामी रंगासारखे फिक्कट रंग कुर्ता आणि ट्राऊझरला देऊन, जॅकेट्ससाठी तपकिरी रंगासारखे गडद रंग वापरण्यात आले.
बदललेला लूक
नारायण राणे यांची शरीरयष्टी लक्षात घेता, गडद रंगाचे फिटेड सूट्स हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरु lok07शकेल. पण सूटचे कापड हलके असले पाहिजे आणि शर्टासाठी फिक्कट रंगांचा वापर करु शकतात.
नारायण राणे
नारायण राणे फिक्कट रंगाचे शर्ट्स आणि गडद रंगाच्या पँट्स घालणे विशेष पसंत करतात. काही प्रसंगी ते यासोबत गडद रंगाचा कोट सुद्धा घालतात.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस विविध रंगांचे, स्ट्राईप्स किंवा चेक्सचे शर्ट आणि गडद रंगाच्या पँट्स घालणे पसंत करतात. बहुतेकदा त्यांच्या शर्टाच्या बाह्या लहान असतात.
सुचवलेला लूक
देवेंद्र फडणवीस यांची शरीरयष्टी पिअर शेपची असल्यामुळे दोन वेगवेगळ्या रंगांचा वापर केल्यास त्यांच्या शरीराचे विभाजन दिसून येते. ते टाळण्यासाठी त्यांना राखाडी, बदामी रंगाचे शर्ट देण्यात आले आहे. नेहरु जॅकेट आणि ट्राऊझरसाठी काळा, गडद निळ्या रंगाचा वापर आहे.
विनोद तावडे
पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे शर्ट आणि गडद रंगाची पँट हा विनोद तावडे यांचा लूक आहे. विनोद तावडे यांच्या शरीरयष्टीला पाहता, पारंपारिक बंदगळा सूट्स घालणे एक उत्तम पर्याय ठरु शकेल. राखाडी, वदामी, क्रिम अशा अर्दी रंगाचा वापर ते करु शकतात.
सर्व रेखांकने – अमोल सावंत