मुंबईबाहेरील नवीन मंत्र्यांनीही  फडणवीस यांच्या पावलांवर पाऊल टाकत तूर्तास आमदार निवासातच मुक्काम करुन पहिल्या दिवसापासून कामाला लागण्याचा धडाका लावला आहे. सामूहिक जबाबदारी म्हणून आम्ही काम पाहण्यास सुरुवात केल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. फडणवीस यांनी आपला मुक्काम तूर्तास आमदार निवासातील आपल्या दालनातच ठेवला आहे. मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा, दिलीप कांबळे हे मंत्री मुंबईबाहेरचे आहेत. त्यांचा मुक्काम आमदार निवासातच आहे. एकनाथ खडसे व विनोद तावडे यांना विरोधी पक्षनेते म्हणून आधीचे बंगले आहेतच. तर मुंबईतील मंत्र्यांना स्वतची निवासस्थाने आहेत व पंकजा मुंडे यांचे निवासस्थान वरळीला आहे. आम्ही बंगले मिळेपर्यंत आमदार निवासातच राहणार आहोत व कामाला सुरुवातही केली आहे., असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह शनिवारी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
*शिवतीर्थवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.
*शिवाजी पार्कवर जाऊन स्वातंत्र्यवीर स्मारकातील सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले.  (छाया-वसंत प्रभू)