News Flash

मोदींचे बंधूही निवडणूक प्रचारात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी गुजरातमधून फौजा धाडण्यात आल्या.

| October 14, 2014 03:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून भारतीय जनता पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी गुजरातमधून फौजा धाडण्यात आल्या. पण आज दस्तुरखुद्द त्यांचे ज्येष्ठ बंधू सोहमभाई मोदी हेदेखील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले. साईभक्त असलेले सोहमभाई हे नेहमीच शिर्डीला येतात. त्यांचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. वाकचौरे यांना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. वाकचौरे यांच्या प्रचाराला राज्यातील एकही नेता अथवा पक्षाचा पदाधिकारी आला नव्हता. त्यामुळे पक्ष कार्यकर्ते अस्वस्थ होते. मात्र वाकचौरे यांच्या स्नेहाखातर आज सोहमभाई हे प्रचारासाठी आले. विशेष म्हणजे त्यांनी दिवसभर एकाच मतदारसंघात निमगावखैरी, उंदिरगाव, बेलापूर व देवळालीप्रवरा येथे सभा घेतल्या. त्यांच्या समवेत पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, सुनील मुथा होते. सोहमभाई यांनी आपले धाकटे बंधू नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 3:03 am

Web Title: modi brother also in election campaign
टॅग : Election Campaign
Next Stories
1 पेडन्यूजप्रकरणी सोलापुरात प्रणिती शिंदे, भालके, परिचारक यांना नोटीस
2 बौद्ध भिक्खूंचे चिवर भगव्यासारखेच! – आठवले
3 ‘काँग्रेस-राष्ट्रवादी तर मरून पडलेला साप, भाजपच आमचा मुख्य शत्रू’
Just Now!
X