मुंबई म्हणजे मिनी हिंदुस्थान आहे. इथे जे घडते तेच देशभरात घडते त्यामुळे मुंबईचा विकास वेगाने होण्यासाठी राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महालक्ष्मी रेसकोर्सवरील भाषणात केले.
मुंबई देशाची आर्थिक प्रगती शक्य नाही आणि महाराष्ट्र पिछाडीवर राहिला तर, संपूर्ण देश मागे पडेल. संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देण्याची ताकद मुंबईत आहे. केंद्रात भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले तर, विकास निश्चित आहे, असेही मोदी म्हणाले.
गेल्या पंधरा वर्षात सर्वाधिक दहशतवादी हल्ले महाराष्ट्रात झाले. विकासाचे राजकारण करण्यापेक्षा केवळ माझ्यावर टीका करण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले वेळ घालवत असल्याचे म्हणत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. मात्र, बीड आणि औरंगाबादप्रमाणे मुंबईतील सभेतही मोदींनी शिवसेनेबद्दल बोलणे टाळले. गुंडागर्दी, दादागिरी, जमिनी आणि झोपडपट्टीवर कब्जा करणे अशा गोष्टी आज महाराष्ट्रात पहायला मिळतात दे दुर्देव असल्याचेही मोदी म्हणाले.
भाजपला स्पष्ट बहुमताने निवडणून द्या, देशातील सर्वोत्कृष्ट मेट्रो मुंबईत असेल, नवी मुंबई विमानतळाचे कामही आम्हीच पूर्ण करू आणि भारतात २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल हे माझं आश्वासन आहे, असेही मोदी पुढे म्हणाले.