News Flash

पृथ्वीराजांच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींच्या सभेबाबत उत्सुकता

प्रतिष्ठित व वजनदार उमेदवारांमधील तुल्यबळ लढतींमुळे गाजत असलेली कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होऊ पहात आहे.

| October 12, 2014 03:07 am

प्रतिष्ठित व वजनदार उमेदवारांमधील तुल्यबळ लढतींमुळे गाजत असलेली कराड दक्षिणची निवडणूक आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमुळे आणखी टोकदार होऊ पहात आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडच्या कर्मभूमीत नरेंद्र मोदी काय बोलणार? नेमकी काय टीका होईल? गर्दीचा आकडा काय राहील? सभेची फलश्रुती काय राहील? अशा चर्चाबरोबरच एकंदरच मोदींच्या दौऱ्याबाबतची उत्कंठता येथे दिसून येत आहे. प्रचाराच्या सांगतादिनी मोदींची सभा येत्या सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजता कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होणार आहे. सभेच्या पाश्र्वभूमीवर प्रशासन व पोलीस सतर्क झाल्याचे चित्र आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:07 am

Web Title: modi to campaign in prithviraj chavans karad
टॅग : Prithviraj Chavan
Next Stories
1 लहरी हवामानामुळे प्रचाराचे तीन तेरा
2 मोदींचे वर्तन गांधीजींच्या विचारांच्या विसंगत- राहुल गांधी
3 बाळासाहेबांनंतर शिवसेनावाढीसाठी उध्दव यांनी कष्ट घेतले; शरद पवारांची स्तुतीसुमने
Just Now!
X