News Flash

पेडन्यूजप्रकरणी सोलापुरात प्रणिती शिंदे, भालके, परिचारक यांना नोटीस

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १७ उमेदवारांना पेडन्यूजप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

| October 14, 2014 02:59 am

सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १७ उमेदवारांना पेडन्यूजप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे [सोलापूर शहर मध्य], राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे [माढा], कॉंग्रेसचे आमदार भारत भालके [पंढरपूर ] यांचा समावेश आहे.
पेडन्यूज प्रकरणात नोटिसा बजावल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे…
करमाळा- रश्मी बागल [राष्ट्रवादी] व संजय शिंदे [स्वाभिमानी शेतकरी],
माढा – बबनराव शिंदे [राष्ट्रवादी], कल्याणराव काळे [कॉंग्रेस], प्रा. शिवाजी सावंत [शिवसेना] व दादासाहेब साठे [भाजप पुरस्कृत अपक्ष],
बार्शी – राजेंद्र मिरगणे [भाजप]
सोलापूर शहर मध्य –आमदार प्रणिती शिंदे [कॉंग्रेस], महेश कोठे [शिवसेना]
सोलापूर दक्षिण – गणेश वानकर [शिवसेना] व युवराज चुंबळकर [मनसे]
सोलापूर शहर उत्तर – विश्वनाथ चाकोते [कॉंग्रेस]
पंढरपूर – प्रशांत परिचारक [स्वाभिमानी शेतकरी] व समाधान अवताडे [शिवसेना]
मोहोळ – रमेश कदम [राष्ट्रवादी]
यापैकी बबनराव शिंदे व गणेश वानकर या दोघांनी नोटिशीवर खुलासा सादर केला असला तरी जिल्हा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीने तो अमान्य केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 2:59 am

Web Title: paid news notice to praniti shinde bharat bhalke others
Next Stories
1 बौद्ध भिक्खूंचे चिवर भगव्यासारखेच! – आठवले
2 ‘काँग्रेस-राष्ट्रवादी तर मरून पडलेला साप, भाजपच आमचा मुख्य शत्रू’
3 BLOG : बापरे! शिवसेना- भाजप टाय झाली तर?
Just Now!
X