परभणीहून लातूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ (एमएच ९ डीएक्स ५२१०) या गाडीतून बुधवारी पोलिसांनी ४ लाख ८५ हजार रुपये रोकड जप्त केली.  गंगाखेड येथील परळी नाक्यावर पोलिसांनी ही गाडी अडवली. विजय भांबळे यांच्या मालकीची ही गाडी असल्याचे चालक कृष्णा हजारे याने सांगितले. गाडीत चार बॅगा होत्या. यातील एका बॅगेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ आणि कपडे होते, तर एका बॅगेत पवारांचे स्वीय सहायक देशमुख यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ आढळून आले. मोठय़ा आर्थिक उलाढालीसाठी गंगाखेड मतदारसंघ राज्यभरात गाजत आहे. राज्यात सध्या सर्वाधिक चच्रेत असलेल्या मतदारसंघांत पसे वाटपाच्या घटना रोजच उघडकीस येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कमालीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अनोळखी वाहनांची चौकशी मोठय़ा प्रमाणात होत आहे. परभणी: परभणीहून लातूरकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ (एमएच ९ डीएक्स ५२१०) या गाडीतून बुधवारी पोलिसांनी ४ लाख ८५ हजार रुपये रोकड जप्त केली.  गंगाखेड येथील परळी नाक्यावर पोलिसांनी ही गाडी अडवली. विजय भांबळे यांच्या मालकीची ही गाडी असल्याचे चालक कृष्णा हजारे याने सांगितले. गाडीत चार बॅगा होत्या. यातील एका बॅगेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ आणि कपडे होते, तर एका बॅगेत पवारांचे स्वीय सहायक देशमुख यांचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ आढळून आले. मोठय़ा आर्थिक उलाढालीसाठी गंगाखेड मतदारसंघ राज्यभरात गाजत आहे. राज्यात सध्या सर्वाधिक चच्रेत असलेल्या मतदारसंघांत पसे वाटपाच्या घटना रोजच उघडकीस येत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कमालीचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. अनोळखी वाहनांची चौकशी मोठय़ा प्रमाणात होत आहे.