News Flash

कृषिमंत्री विखे यांच्याकडे साडेसोळा कोटींची संपत्ती

कृषिमंत्री तथा शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी शालिनीताई यांच्याकडे साडेसोळा कोटी स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

| September 27, 2014 03:17 am

कृषिमंत्री तथा शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी शालिनीताई  यांच्याकडे साडेसोळा कोटी स्थावर व जंगम मालमत्ता आहे. राधाकृष्ण विखे यांच्याकडे ५ कोटी  १६ लाख ३२ हजार ११६ रुपयांची जंगम मालमत्ता व त्यांच्या पत्नी शालिनीाताई विखे पाटील यांच्याकडे १ कोटी ६९ लाख ८३ हजार ४६८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. राधाकृष्ण यांच्या बँक बचत खात्यात २२ लाख १६ हजार ७५९ रुपयांची शिल्लक आहे. शालिनीताई विखे यांच्या बँक बचत खात्यात ३ लाख ७३ हजार ९२४ रुपये आहेत. तर राधाकृष्ण विखे यांच्याकडे २५ हजार ८८५ रुपये रोख तर शालिनीताई यांच्याकडे ५५ हजार ६४५ रुपयांची रोकड आहे. राधाकृष्ण विखे व त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे या दोघांच्या विविध बँकेतील तसेच सहकारी संस्थांमधील खात्यांत तसेच बँक खात्यातील शिल्लक, बंध पत्रे, भागभांडवल, म्युच्युल फंड, राष्ट्रीय बचत योजना, विमा पत्रे असे मिळून ६ कोटी ८६ लाख १५ हजार ५८४ रुपयांची मालमत्ता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:17 am

Web Title: radha krishna vikhe patil asset 16 crore
टॅग : Vikhe Patil
Next Stories
1 प्रताप सरनाईक यांच्यावर २० गुन्हे
2 सरदार तारांसिंग यांची श्रीमंती पाच पर्षांत अडीचपट
3 चौरंगी, पंचरंगी लढतींमुळे सर्वच पक्षांची कसोटी
Just Now!
X