News Flash

तासगावच्या मनसे उमेदवारावर खोटे गुन्हे -राज

तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त दिला नाही. यामुळे शहरातील विकास कामे रखडली असून विधानसभा निवडणुकीनंतर आपण स्वत: सहा महिने येथे ठाण मांडून

| October 12, 2014 03:50 am

तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने नाशिक महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त दिला नाही. यामुळे शहरातील विकास कामे रखडली असून विधानसभा निवडणुकीनंतर आपण स्वत: सहा महिने येथे ठाण मांडून नाशिकचा विकास करून दाखविणार असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. भाजपला ६० जागांवर उमेदवार सापडले नाहीत. राष्ट्रवादी व काँग्रेसमधून आलेल्यांना त्यांना उमेदवारी द्यावी लागली. अशा मंडळींच्या प्रचारासाठी पंतप्रधान सभा घेत असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना तासगावचे मनसेचे उमेदवार व त्यांच्या पत्नीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप राज यांनी केला.सिडकोतील संभाजी मैदानावर झालेल्या सभेत राज यांनी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:50 am

Web Title: raj thackeray hits back at rr patil over rape remark
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 मुंबईत काँग्रेसने शक्तिप्रदर्शन टाळले
2 आता ५६ इंच छातीचा कोट कुठे गेला?
3 शनिवारचे ‘लक्ष्मीदर्शन’
Just Now!
X