05 March 2021

News Flash

राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा

लोकसभा निवडणुकींनंतर विधानसभा निवडणुकीतही पानिपत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

| October 30, 2014 03:00 am

लोकसभा निवडणुकींनंतर विधानसभा निवडणुकीतही पानिपत झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवसंजीवनी देण्यासाठी आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते संघटनात्मक बांधणीवर भर देणार आहेत. विधानसभा निवडणुकीत याच संघटनात्मक बांधणीच्या अभावी मनसेच्या आमदारांची संख्या बारावरून एकावर आली आणि पक्षासह पक्षप्रमुखही तोंडावर आपटले.
विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमधून फुगवलेला महाराष्ट्राच्या विकासाचा फुगा मतदारांनी मनसेला सपशेल झिडकारून फोडला. त्यानंतर मरगळ आलेल्या पक्षनेतृत्त्वावर विश्वास दाखवण्यासाठी राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘कृष्णभूवन’ येथे येणार असल्याची चर्चाही होती. त्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे आता ३, ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, मनसेच्या सपशेल पराभवानंतर मनसेमधील नाराज माजी आमदार प्रवीण दरेकर पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी दरेकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली. दरेकर यांच्या नाराजीबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे या भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2014 3:00 am

Web Title: raj thackeray to visit maharashtra
टॅग : Mns,Raj Thackeray
Next Stories
1 राहुल गांधींचे पहिले पाढे पंचावन्न!
2 काँग्रेसवर अजूनही जातीपातींचा पगडा
3 दिल्लीत ‘आप’चा प्रभाव कायम
Just Now!
X