औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उमदेवारी अर्ज दाखल करणाऱ्या शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा दाम्पत्याची चल-अचल संपत्ती ५७ कोटी ३५ लाख रुपये असल्याचे शपथपत्रातून स्पष्ट झाले.
दर्डाच्या नावे २९ कोटी ७७ लाख, तर त्यांची पत्नी आशु दर्डा यांच्या नावे १२ कोटी ४ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. या दाम्पत्याच्या नावे १५ कोटी ५३ लाख रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल असून, जबलपूर, नागपूर येथील न्यायालयांत कार्यवाही सुरू आहे. एक प्रकरण बंद केल्याचा उल्लेख शपथपत्रात आहे.
चल संपत्तीचा लेखाजोखा आयोगासमोर सादर करताना स्वत:कडे ९ लाख ४३ हजार रुपये रोकड, तर पत्नीकडे २ लाख ४१ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. बाँड व टपाल खाते, तसेच विमा कंपन्यातील गुंतवणूक केल्याचेही म्हटले आहे. काही संस्था व व्यक्तींना कर्जही दिले आहे. त्यांच्याकडे एक गाडीही आहे.