News Flash

शिवसेनेने पराभव स्वीकारल्याने भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप- रुडी

भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप घेणाऱया शिवसेनेला पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच आमच्यावर असे आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे महाराष्ट्र

| October 14, 2014 04:54 am

भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप घेणाऱया शिवसेनेला पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच आमच्यावर असे आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिले.
भाजपच्या देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, एकनाथ खडसे यांच्यासह काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अजित पवार या उमेदवारींनी आपल्या छायाचित्रांचा वापर पक्षाच्या जाहिरातींमध्ये केल्यामुळे तो खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. नाहीतर, या उमेदवारांना अपात्र ठरवावे असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. यावर बोलताना रुडी म्हणाले की, “राज्यात भाजप बहुमताने निवडून येणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेलाही पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणूनच असे आरोप केले जात आहेत.”
* पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा
आघाडी सरकार वाचवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी सर्व घोटाळे खोरांना पाठीशी घातल्याचे खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अप्रत्यक्षरित्या मान्य केल्याचे रुडी यावेळी म्हणाले. ‘द टेलिग्राफ’ या इंग्रजी वृत्तपत्राला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीच्या आधारावर ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांना भ्रष्ट कारभार समोर दिसत होता पण, कारवाई केली असती तर, सरकार पडले असते अशी कबुली खु्द्द चव्हाण यांनी या मुलाखतीत दिली असल्याचे रुडी म्हणाले. आदर्श घोटाळ्याप्रकरणी कारवाई केली असती तर, काँग्रेस पक्षाला आपले नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना गमवावे लागले असते म्हणून पृथ्वीराज चिडीचूप राहीले, असेही रुडी म्हणाले. तसेच आघाडीचे सरकार रहावे यासाठीच सिंचन घोटळ्याप्रकरणी अजित पवार आणि संबंधितांवर कारवाई न केल्याचीही कबुली चव्हाण यांनी दिली असल्याचे रुडी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 4:54 am

Web Title: rajiv pratap rudi hit backs shiv sena allegations on bjp advertisement
टॅग : Bjp
Next Stories
1 परभणीत मनसेच्या उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश
2 स्वबळाच्या प्रयोगाची परीक्षा!
3 निवडणुकीतील नारायण : काँग्रेस कार्यालयातील ‘सागर’
Just Now!
X