News Flash

१५ जागा द्या, अन्यथा..

विधानसभेच्या किमान १५ जागा सोडा आणि त्याचा निर्णय १० सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करावा लागेल, असा अंतिम इशारा बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी

| September 4, 2014 04:27 am

विधानसभेच्या किमान १५ जागा सोडा आणि त्याचा निर्णय १० सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करावा लागेल, असा अंतिम इशारा बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा जो शब्द दिला होता, त्याचे महायुतीकडून पालन केले जात नाही, अशी नाराजी रिपाइंचे प्रवक्ते अर्जून डांगळे यांनी बोलून दाखविली. बुधवारी पत्रकार परिषद घेऊन डांगळे यांनी महायुतीला निर्वाणीचा इशारा दिला. रिपाइंला किमान १५ जागा मिळाव्यात, एक-दोन जागांचा फरक झाला तरी चालेल, परंतु त्यापेक्षा कमी जागा घेण्याची पक्षाची तयारी नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी सुरेश बारसिंग, तानसेन ननावरे, श्रीकांत भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तावडे यांची रिपाइं नेत्यांशी चर्चा
रिपाइंच्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेऊन भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सकाळी पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर व माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांच्याशी चर्चा केली. रिपाइंला भाजपच्या कोटय़ातून कुलाबा, चेंबूर, विक्रोळी, पिंपरी, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर व बाळापूर हे आठ मतदारसंघ मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यावर चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले. या बैठकीबाबत डांगळे यांना विचारले असता, आपल्याकडे अधिकृत काही माहिती आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:27 am

Web Title: rpi forces for 15 assembly seats
टॅग : Rpi
Next Stories
1 सुधारणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी बक्षी समितीवर
2 कोल्हे यांचा राष्ट्रवादीला रामराम?
3 निवडणुकांतील काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष पथक