पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पांना खीळ घालण्याचे काम करणाऱ्या विदर्भवादी नितीन गडकरींसाठी गालिचा अंथरणाऱ्या लोकांचे कृत्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचे दुर्दैव असून हा जनतेशी द्रोह असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बठकीत बोलताना आबांनी पक्षत्याग करून भाजपामध्ये जाणाऱ्या नेत्यांवर कडाडून टीका केली.
जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांची बठक शनिवारी पक्षाच्या कार्यालयात झाली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बठकीस ग्रामविकासमंत्री जयंत पाटील उपस्थित होते.
कृष्णा खोरे प्रकल्पासाठी जास्त निधी पश्चिम महाराष्ट्राने नेला असल्याचा आरोप करीत सिंचन अनुशेषाचा मुद्दा राज्यपालांकडे उपस्थित केल्याने या योजना निधीअभावी रखडल्या. याबाबत गडकरी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी दरोडेखोर असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. अशा मंडळींचे सांगली जिल्ह्य़ात स्वागत करण्यासाठी अहमहमिका लागते हे या भागाचे दुर्दैव म्हणावे लागेल. टोलविरोधी आंदोलन करणारे आज केंद्रात सत्तेवर आहेत. िहमत असेल तर त्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करून दाखवावेत असे आवाहन आबांनी या वेळी केले.