07 July 2020

News Flash

‘सोशल मीडिया’वरील अफवांचा सदाशिव मंडलिकांकडून समाचार

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीबाबत ‘सोशल मीडिया’त गेले दोन-तीन दिवस टोकाची चर्चा सुरू झाली आहे.

| October 26, 2014 06:31 am

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रकृतीबाबत ‘सोशल मीडिया’त गेले दोन-तीन दिवस टोकाची चर्चा सुरू झाली आहे. चच्रेमुळे मंडलिक कुटुंबीय व समर्थकांना ऐन दिवाळीत मनस्ताप झाला आहे. तर या प्रवृत्तीचा खरपूस समाचार घेणारे पत्रक मंडलिक यांनी शनिवारी प्रसिध्दीस दिले असून विधानसभा निवडणूक निकालाच्या पाश्र्वभूमीवर माझी प्रकृती अत्यवस्थ असल्याच्या अफवा पसरवल्या जात  आहेत. माझी प्रकृती ठणठणीत असून वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मंडलिक समर्थक कागल पंचायत समितीचे उपसभापती भूषण पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या निवेदनात मंडलिक यांच्याविषयी अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 6:31 am

Web Title: sadashivrao mandlik social media
टॅग Social Media
Next Stories
1 मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा भाजपचा प्रयत्न
2 चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?
3 प्रवीण दरेकर भाजपच्या वाटेवर?
Just Now!
X