सावनेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी अवैध ठरवला. मुसळे हे सरकारी कंत्राटदार असल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. चुरशीच्या होणाऱया निवडणुकीत एक एक जागा महत्त्त्वाची असताना सावनेरमधील निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार सुनील केदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुसळे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून आता कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही.
उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेवेळी मुसळे यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष होते.

Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Nagpur Lok Sabha Constituency decision to reject nomination of Adv Pankaj Shambharkar is upheld by High court
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘या’ उमेदवाराला झटका; उच्च न्यायालय म्हणाले, ‘निवडणुकीत हस्तक्षेप…’
rashmi barve willing to contest lok sabha elections from congress in ramtak lok sabha constituency get notice over caste certificate
रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, संभाव्य उमेदवाराला नोटीस
bahujan maha party declare candidate for palghar
पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन महापार्टीची रिंगणात; परेश सुकूर घाटाळ यांना उमेदवारी जाहीर