26 September 2020

News Flash

‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’ म्हणणारेच मुख्यमंत्री झाले !

विदर्भावर होणाऱ्या अन्यायामुळे संतापाच्या भरात ‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’, असे विधान विधानसभेत करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.

| November 1, 2014 02:35 am

विदर्भावर होणाऱ्या अन्यायामुळे संतापाच्या भरात ‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’, असे विधान विधानसभेत करणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. विदर्भ, मराठवाडा विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र, असा वाद अलीकडच्या काळात नेहमीच विधिमंडळात बघायला मिळतो. नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या विकासावर चर्चा सुरू असताना एरवी सौम्य असणारे फडणवीस यांचा पारा चढला. राज्यकर्त्यांकडून कायम विदर्भाला डावलले जाते. हे असेच सुरू राहणार असल्यास महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा, असे संतापाच्या भरात फडणवीस बोलून गेले. यामुळे सभागृहात तेव्हा एकच गदारोळ झाला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी फडणवीस यांच्या विधानाला आक्षेप घेतला होता. आघाडी सरकारकडून नेहमीच विदर्भावर अन्याय केला जायचा. निधी देण्यास हात आखडते घेतल्यानेच संतापाच्या भरात आपण महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा, असे म्हटले होते, असे फडणवीस यांनी नंतर स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 2:35 am

Web Title: separate vidarbha movement supporter fadnavis becomes maharashtra cm
Next Stories
1 श्रम सार्थकी लागले!
2 कुठे नेऊन ठेवणार महाराष्ट्र?
3 उठा उठा सत्ता आली, कामाला लागण्याची वेळ झाली..
Just Now!
X